मेट्रो-5 व 6 प्रकल्प 2021 पर्यंत मार्गी लावणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - मेट्रो जाळ्याच्या विस्तारीकरणाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या स्वामी समर्थनगर-जोगेश्‍वरी-विक्रोळी या "मेट्रो 6' आणि ठाणे-भिवंडी-कल्याण या "मेट्रो 5' च्या प्रकल्प अहवालास मंगळवारी (ता. 24) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे दोन्ही प्रकल्प 2021 पर्यंत मार्गी लावण्याचा मानस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) व्यक्त केला आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण हा "मेट्रो 5' प्रकल्प 23.50 किलोमीटरचा असून, त्यावर 17 रेल्वेस्थानके असतील. सहा डब्यांची ट्रेन या मार्गावर धावणार असून, 2021 पर्यंत दररोज 2 लाख 29 हजार नागरिक या मार्गावरून प्रवास करू शकतील. स्वामी समर्थनगर-जोगेश्‍वरी-विक्रोळी हा "मेट्रो 6' प्रकल्प 14.5 किलोमीटरचा आहे. या मार्गावर 13 स्थानके प्रस्तावित आहेत. सहा डब्यांची ट्रेन या मार्गावर धावेल. 2021 पर्यंत या मार्गावरून 6 लाख 5 हजार लोक प्रवास करतील, असा अंदाज आहे. या मार्गाचे सर्वेक्षण एमएमआरडीएने पूर्ण केले आहे. मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने लवकरच या मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानुसार 2021 पर्यंत हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्याचे एमएमआरडीएने ठरवले आहे.

Web Title: mumbai news mwtro 5 & 6 project