नाट्य परिषदेचा अध्यक्ष 6 एप्रिलला ठरणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष येत्या 6 एप्रिलला ठरणार आहे. कार्यकारिणी मंडळासाठीही गुप्त मतदान होणार आहे त्यामुळे नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, हेही अखेर जाहीर करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत "आपलं पॅनेल'तर्फे प्रसाद कांबळी, तर "मोहन जोशी पॅनेल'च्या वतीने डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये लढत होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबईत "आपलं पॅनेल'चा वरचष्मा दिसून आला होता. आपलं पॅनेल 11, तर मोहन जोशी पॅनेलच्या वतीने पाच जण मुंबई आणि विभागातून जिंकून आले आहेत.
Web Title: mumbai news natya parishad chairman selection