मरगळ झटकून कामाला लागा - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

धारावी - सत्ता असो किंवा नसो; नागरिकांचे प्रश्‍न धसास लावण्यासाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे, असा कानमंत्र देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लागण्याचा सल्ला दिला. धारावीतील इंदिरानगर, नेत्रावाला कंपाऊंड येथील धारावी तालुका कार्यालयाचे उद्‌घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी (ता. 8) सायंकाळी 8 वाजता करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. 

या वेळी झालेल्या जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे भर पावसात मंचावर आल्या होत्या. 

धारावीत झालेल्या परिवर्तन सभेत सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, धारावीचा रखडलेला विकास आदी विषयावर सरकार तोंडघशी पडल्याचे त्या म्हणाल्या. आघाडी सरकारने अनेक योजना राबवल्या होत्या. पक्षाचे तालुका कार्यालय नागरिकांसाठी नेहमी खुले असले पाहिजे. सध्याचे सरकार अकार्यक्षम आहे. ते उघडे पडत आहेत. यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस सुरू असतानाही शेकडो नागरिक सभेसाठी उपस्थित होते. सुळे यांच्या सभेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास व उत्साह संचारला. पहिल्यांदाच सुप्रिया सुळे धारावीत आल्या होत्या. कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेकडे सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. 

धारावीचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्याला सरकारने प्राधान्य द्यायला पाहिजे होते. त्यांनी धारावीतून याच मुद्द्यावर मते मागितली. सरकारविरोधात रान उठले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले. मंचावर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष रमेश परब, स्थानिक नगरसेविका रेशमा बानो वकील शेख, माजी नगरसेवक वकील शेख आदी उपस्थित होते. 

Web Title: mumbai news NCP supriya sule