नवी मुंबई विमानतळाबाबत  न्यायालयाचे सरकारला खुलासा करण्याचे निर्देश 

नवी मुंबई विमानतळाबाबत  न्यायालयाचे सरकारला खुलासा करण्याचे निर्देश 

मुंबई - नवी मुंबईमधील प्रस्तावित विमानतळामुळे पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने खुलासा करण्याचे निर्देश दिले. 

वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवर आज न्या. अभय ओक व न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने सन 2010 मध्ये येथील विमानतळाला पर्यावरणाबाबत ना हरकत परवानगी दिलेली आहे; मात्र संबंधित परवानगी नियमांची पूर्तता न करता देण्यात आल्याचा दावा याचिकादारांनी केला आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com