अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई - दूरचित्रवाणीवरील अभिनेता मनोज गोयल यांच्या पत्नीने समतानगर येथील घरात गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली.

मुंबई - दूरचित्रवाणीवरील अभिनेता मनोज गोयल यांच्या पत्नीने समतानगर येथील घरात गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली.

नीलिमा गोयल (वय 40) असे तिचे नाव आहे. मनोज यांनी "सब' टीव्हीवरील "गोलमाल है भाई सब गोलमाल है', "तू मेरे अगल बगल है' आदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ते कॅमेरामन म्हणूनही काम करत होते. मनोज आणि नीलिमा यांना आठ वर्षांची एक मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून नीलिमा नैराश्‍यात होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये नैराश्‍यातूनच आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही, असे लिहिले आहे. नीलिमा शनिवारी घरात एकटी होती. मनोज कामानिमित्त बाहेर होते; तर मुलगी शिकवणीसाठी बाहेर होती. मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता.

Web Title: mumbai news nilima manoj goal suicide