राम गोपाल वर्मांना ट्विटमुळे समन्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - ट्विटरवर गणपतीबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना समन्स बजावले आहे.

मुंबई - ट्विटरवर गणपतीबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना समन्स बजावले आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि इंडस कम्युनिकेशन्सचे प्रमुख विवेक शेट्टी यांनी दंडाधिकारी न्यायालयात वर्मा यांच्याविरोधात फौजदारी तक्रार केली आहे. वर्मा यांच्या ट्विटमुळे हिंदू समाजातील अनेकांच्या भावना दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. वर्मा यांच्या ट्विटचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले होते. या प्रकरणाची सुनावणी 19 जुलैला होईल.

Web Title: mumbai news notice for tweeting Ram Gopal Varma