ओला, उबेरचा आज चक्का जाम

पीटीआय
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेमार्फत ओला आणि उबेरच्या चालकांनी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. ओला, उबेरच्या व्यवसायात दिवसेंदिवस होणारी उत्पन्नातील घट याच मुख्य कारणासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेमार्फत ओला आणि उबेरच्या चालकांनी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. ओला, उबेरच्या व्यवसायात दिवसेंदिवस होणारी उत्पन्नातील घट याच मुख्य कारणासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने ही संपाची हाक दिली आहे. बुडणारे उत्पन्न भरून काढण्यासाठी ओला आणि उबेरमार्फत वाहन चालकांना अनेक आश्वासने देण्यात आली; पण प्रत्यक्षात ही घट भरून निघालेली नाही. या वाहनचालकांनी 5 लाख ते 7 लाख रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामध्ये महिन्याला दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा केली जात होती; पण वाहनचालकांना यापैकी निम्मेही उत्पन्न मिळत नाही.

याला कारण दोन्ही कंपन्यांमधील व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार हेच बोलले जात आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या संजय नाईक यांनी दिली. वाहनचालकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही हा संप आगामी काळात कायम ठेवू, असेही ते म्हणाले. मुंबई टॅक्‍सीमेन युनियननेही या संपाला पाठिंबा दिला आहे. दिल्ली, बंगळूर, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या शहरातील वाहनचालक या संपाला पाठिंबा देणार असल्याचे कळते.

ओला, उबेरचालकांचा संपाचा इशारा 
मुंबईतील स्थिती 

ओला, उबेर कॅबची संख्या - 45,000 
प्रतिवाहन गुंतवणूक - 5 ते 7 लाख 
अपेक्षित उत्पन्न - 1.5 लाख 

Web Title: mumbai news ola uber chakka jam agitation