ओला-उबेर चालकांचा इंधनदरवाढीविरोधात संप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई - मोबाईल ऍपवर आधारित ओला-उबेरच्या दरात वाढ करावी, या मागणीसाठी ओला-उबेरची सेवा देणारे चालक उद्या (ता. 6) संपावर जाणार आहेत. इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे मोठ्या संख्येने ओला-उबेर चालक या संपात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. या संपात रिक्षा, काळी-पिवळी टॅक्‍सीचालकही सहभागी होण्याची शक्‍यता आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. ऍपवर आधारित सेवा देणाऱ्या चालकांचे समूह असलेली महाराष्ट्र सक्रिय समितीही या मोर्चात सहभागी होणार आहे. ओला-उबरेच्या सेवा देणाऱ्या बहुतांश मोटारी या डिझेलवर धावतात. डिझेलचे दर प्रतिलिटर 48 वरून थेट 68 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोलनेही लिटरमागे 80 रुपयांचा पल्ला गाठला आहे. दरवाढ झाल्यानंतरही प्रवासी भाडे वाढवण्याबाबत अद्याप काहीच हालचाल नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: mumbai news ola uber driver strike fuel