कांद्याचा भाव २५ रुपयांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नवी मुंबई - काही महिन्यांपासून सातत्याने वाढणारे कांद्याचे भाव घसरले असून, आता कांदा प्रति किलो ४० रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारातही कांदा ४० रुपये किलोने उपलब्ध आहे. दरम्यान, कांद्याची आवक वाढल्यास भाव आणखी घसरण्याची शक्‍यता आहे. 

वाशीतील घाऊक बाजारात नेहमी कांद्याच्या १२० ते १३० गाड्या येतात. बाजारात कांद्याची टंचाई पाहून शेतकरी कमी कांदा पाठवत होते; मात्र आता सरकारने कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाव गडगडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कांदा पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भावात घसरण होत आहे. 

Web Title: mumbai news onion