

Police Helpline Complaints
ESakal
मुंबई : मुंबईकरांना तातडीने पोलिसांची मदत मिळावी म्हणून १००, ११२ हा हेल्पलाईनवर गुन्हे, आग, पडझड किंवा रस्त्यावरील अपघातांची माहिती देणारे, मदत मागणारे फोन येतात, असा सर्वसामान्य नागरिकांचा अंदाज असू शकतो; मात्र या हेल्पलाईनवर वडापाव विक्रेता पावला चटणी लावत नाही, चहावाला प्लॅस्टिकचे कप वापरतो, वाळत घातलेले कपडे इमारतीच्या खालील मजल्यांवर अडकून पडलेत, गाडी पुसायचा कापड चोरी झाला, अशा मजेशीर तक्रारींचा पाऊस पडत आहे.