मुंबईने गाठली दिल्लीच्या प्रदूषणाची पातळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - धुरक्‍याच्या प्रभावाने मुंबईसह नवी मुंबईची हवा सलग दुसऱ्या दिवशी रविवारी खराब दिसून आली. आज धुरक्‍याच्या प्रभावामुळे मुंबईतील हवेचा दर्जा शनिवारपेक्षाही जास्त खालावला होता. उद्या (सोमवारी) देखील मुंबई व नजीकच्या भागात धुरक्‍याचा प्रभाव कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. नवी मुंबईतील हवेचा दर्जा आज अत्यंत वाईट या वर्गवारीत होता. शनिवारी नवी मुंबईतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण 349 वर होते. नवी मुंबईत खालावलेल्या हवेच्या दर्जाने थेट दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची मर्यादा गाठली.
Web Title: mumbai news pollution