प्राध्यापकांच्या गणपतीच्या सुट्या रद्द?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - प्राध्यापकांवरील उत्तरपत्रिका तपासणीचा दबाव आणि शिकवणीच्या कामाचा ताण पाहता मुंबई विद्यापीठ आता त्यांच्या गणपतीच्या सुट्या रद्द करण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग अद्याप सुरू झाले नसल्याने हा निर्णय निश्‍चित अमलात आणला जाईल, असे समजते.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परीक्षेचे पहिले सत्र ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण होते. त्यापूर्वी 180 दिवसांचे वर्ग चालावे लागतात; मात्र ऑनस्क्रीन उत्तरपत्रिकेच्या गोंधळात अगोदरच 180 पैकी 90 दिवस वाया गेले आहेत. उर्वरित 90 दिवसांतील प्राध्यापकांच्या सुट्यांना कात्री लावणे हा एकमेव पर्याय विद्यापीठामोर आहे. गणपतीच्या सुट्या रद्द करून कोणत्याही परिस्थितीत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रक्रिया सुरू करण्याचे उद्दिष्ट मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ठेवले आहे; परंतु आता मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. दिवाकर शिंदे यांची नियुक्ती झाल्याने हा निर्णय अमलात येईल का, याबाबत प्राध्यापकांत चर्चा आहे.

Web Title: mumbai news professor ganeshotsav leave cancel