मुंबईत रेल्वे मार्गांवरील अपघातात 13 ठार; तर 7 जखमी

मंगेश सौंदळकर
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई : शहरातील रेल्वेच्या तिन्ही प्रमुख मार्गांवर गुरुवारी (ता. 8) झालेल्या विविध अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 13 वर पोचली, तर यामध्ये 7 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 महिलाचा समावेश आहे, तर 6 मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

जखमींमध्ये 5 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यात बळी पडणाऱ्या प्रवाशांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. 

सेंट्रल रेल्वेअंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते कसारा, वेस्टर्न रेल्वेमध्ये चर्चगेट ते पालघर, तसेच हार्बर रेल्वेअंतर्गत सीएसटी ते पनवेल हे प्रमुख मार्ग आहेत. 
अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. तसे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. दररोज वेगवेगळ्या मार्गांवर सरासरी किमान 3 ते जास्तीत जास्त 10 लोक मृत्युमखी पडतात. 

Web Title: mumbai news railway accident 13 dead, 7 injured rail crossing