रेल्वे हद्दीत वृत्तपत्र विक्रेत्यांना परवानगी द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई  - मुंबईसह राज्यात रेल्वे हद्दीत वृत्तपत्र विक्रेत्यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करीत भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी आज दिल्ली येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. रेल्वे हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांवर फेरीवाल्यांसोबतच कारवाई करण्यात येत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत शेलार सतत पाठपुरवा करीत असून, त्यांनी यापूर्वीही रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कारवाई करू नये, अशी विनंती केली होती. वृतपत्र विक्रेता हा वृतपत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असल्यामुळे याबाबतची लक्षवेधी नागपूर अधिवेशनात शेलार यांनी उपस्थित केली होती; तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिका हद्दीतील विक्रेत्यांनाही त्यांनी न्याय मिळवून दिला होता.
Web Title: mumbai news railway area newspaper sailer permission