मालाड 'सबवे'मध्ये पाणी; उपनगरात पावसाचा जोर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई : मध्यरात्री मुंबईत पावसाने चांगलाच जोर पकडला. त्यामुळे मालाड 'सबवे'ला पाणी तुंबले. पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यामुळे शहरातील नाले सफाईवर शंका व्यक्त केली जात आहे. 

मध्यरात्री पावसाने चांगलाच जोर पकडला होता. उपनगरात गडगडाटासह तुफाव पाऊस पडत होता.मालाड येथील सबवे मध्ये पाणी साचल्या मुळे महापालिकेने पाणी उपसणारे पंप सुरु केले.मात्र पावसाचा जोर जास्त असल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येत होता.

पावसाने मुंबईला झोडपून काढण्यास सुरवात झाली आहे. मात्र, मान्सून पूर्व पावसातच सुरवातीला पाणी साचू लागल्यामुळे मुंबईच्या नाले सफाईवर पुन्हा एकदा शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: mumbai news rain malad subway water block