बलात्काराचा आरोप असणाऱ्या विश्‍वस्तांना शाळेत येण्यास मनाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - बलात्काराचा आरोप असलेल्या अंधेरीतील एका आंतरराष्ट्रीय शाळेच्या विश्‍वस्तांना पुढील आदेश मिळेपर्यंत शाळेत येण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 26) अंतरिम मनाई केली.

मुंबई - बलात्काराचा आरोप असलेल्या अंधेरीतील एका आंतरराष्ट्रीय शाळेच्या विश्‍वस्तांना पुढील आदेश मिळेपर्यंत शाळेत येण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 26) अंतरिम मनाई केली.

गतवर्षी एका तीन वर्षांच्या मुलीने तिच्या आईकडे केलेल्या तक्रारीनंतर ही घटना उघडकीस आली होती. शाळेच्या एका छायाचित्रातून तिने संबंधित आरोपी विश्‍वस्ताचे नाव उघड केले होते. संबंधित आरोपी परदेशी नागरिक आहे. मे 2017 मध्ये पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती; मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे तिने उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती; मात्र सत्र न्यायालयाने आरोपीला नोव्हेंबर 2017 मध्ये जामीन मंजूर केला. हा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी आईने उच्च न्यायालयात पुन्हा याचिका केली आहे. तसेच, शाळेतील अन्य सुमारे 42 पालकांनीही विश्‍वस्ताला शाळेत येण्यास मनाई करण्याची मागणी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली. मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे पालकांचे म्हणणे आहे. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्यापुढे सुनावणी झाली.

Web Title: mumbai news rape case crime Trustee