मूकबधीर मुलीवर बलात्कार करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी 'युपी'तून घेतले ताब्यात

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

दीड वर्षांपूर्वी एका मूकबधीर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील फरेंदा येथून ताब्यात घेतले आहे.

मुंबई : दीड वर्षांपूर्वी एका मूकबधीर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील फरेंदा येथून ताब्यात घेतले आहे.

चौदा वर्षाच्या पीडित मूकबधीर मुलीने 6 डिसेंबर 2016 रोजी पोटात दुखत असल्याची तक्रार केली. तपासणीअंती ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर सविस्तर तपासणीअंती तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर बोरिवली पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र पीडित मुलगी मूकबधीर असल्याने संशयित आरोपींबद्दल माहिती काढणे अवघड जात होते.

मोठ्या परिश्रमानंतर मुंबई पोलिसांनी पीडित मुलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या कामगाराने किंवा बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यानेच तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती काढली होती. तब्बल एक वर्षांच्या परिश्रमानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील फरेंदा येथून मुंबई पोलिसांच्या एका पथकाने केलेल्या कारवाईत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: mumbai news rape crime up accused arrested mumbai police