रश्मी शुक्ला प्रकरण, अखेर 'मोठी' अपडेट आली समोर

रश्मी शुक्ला प्रकरण, अखेर 'मोठी' अपडेट आली समोर

मुंबई : राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय पत्र आणि इतर तांत्रिक माहिती लीक झाल्याप्रकरणी अखेर शुक्रवारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑफीशियल सिक्रेट ऍक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त करणार आहेत.

भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 च्या कलम 30, माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा 2008 कलम 43 (ब), ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 कलम 5 अंतर्गत अनोळखी व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडून याबाबत तक्रार देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अधिकृत नोट काढून या वृत्ताला दुजोरा दिला.

मुख्यसचिव सिताराम कुंटे यांनी नुकताच राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार तत्कालीन पोलिस महासंचालकांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी सादर केलेला रश्मी शुक्ला यांचा अहवाल प्रसार माध्यमातून उघड झाल्याचे दिसते. त्यासोबतच काही पेन ड्राईव्हवरील डेटा उघड झाल्याची बाब पुढे आली आहे. मात्र शासनाला जेव्हा पोलिस महासंचालकांनी अहवाल पाठविला त्यासोबत पेन ड्राईव्ह नव्हता. उघड झालेल्या अहवालाची प्रत पाहता (संलग्न) ती रश्मी शुक्ला यांच्याकडे असलेल्या ऑफिस कॉपीची प्रत असल्याचे सकृत दर्शनी दिसते. 

त्यावरून ही प्रति त्यांच्याकडूनच उघड झाली असावी असा संशय येतो. सदर पत्र टॉप सिक्रेट असताना देखील उघड करण्यात आलं, ही बाब गंभीर आहे. दरम्यान संशय असल्याची बाब सिध्द झाल्यास कठोर कारवाईस पात्र ठरतील, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. 

mumbai news rashmi shukla case complaint registered in top secret leak case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com