Mumbai News : बेस्टच्या प्रवासी संख्येत घट! सहा महिन्यात २ लाख प्रवासी झाले कमी

mumbai best bus
mumbai best bussakal

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या प्रवासीसंख्येत लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दैनंदिन प्रवासी ३५ लाखांवरून ३३ लाखांपर्यंत घसरल्याचे समोर आले आहे.

mumbai best bus
Uddhav Thackeray : 'मी स्वतः उद्धव ठाकरेंना बारसुची जागा दाखवली होती, ते सरड्यासारखा रंग बदलत आहेत...'

सहा महिन्यांत किमान दीडशे जुन्या बस टप्प्याटप्प्याने बाहेर पडणे, नवीन इलेक्ट्रिक बसच्या वितरणात होणारा विलंब आणि मिडी इलेक्ट्रिक बसची कमी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता यांसह इतर काही कारणांमुळे प्रवासी घटल्याचे परिवहन तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

बेस्ट वर्कर युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी आपले निरीक्षण नोंदवताना सांगितले, की सेवेची गुणवत्ता, असुरक्षित बस, खराब देखभाल आणि वितरणातील विलंबासाठी ‘वेट लीज मॉडेल’ जबाबदार आहे. सेवांचा दर्जा खालावला आहे. लांब मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, असेही ते म्हणाले. बसच्या अपुऱ्या संख्येमुळे गर्दीच्या वेळी बसथांब्यावर बराच वेळ ताटकळत राहावे लागत असल्याची तक्रार अनेक प्रवासी करत आहेत.

mumbai best bus
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या आमदाराचा नाना पटोले, संजय राऊतांना इशारा म्हणाले, 'आमची भूमिका...'

बेस्टकडे १२ मीटर लांबीच्या अधिक बस होत्या, ज्यात ४५-५० प्रवासी प्रवास करत होते; परंतु आता त्यांची संख्या कमी झाली आहे. बहुतेक इलेक्ट्रिक एसी मिडी बसची प्रवासी क्षमता ३३ आहे. त्यामुळे प्रवाशांवर परिणाम होत आहे, असे फोर्ट विभागात नियमित प्रवास करणारे कृष्णा जाधव म्हणाले. अलीकडच्या काही महिन्यांत बेस्टच्या ताफ्यातील गाड्या ३,६१९ वरून ३,२२८ पर्यंत कमी झाल्या आहेत.

बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी सर्व मेट्रो स्थानकांवर फीडर मार्ग सुरू करण्याची योजना आहे. मे महिन्यात नवीन सिंगल-डेकर आणि इलेक्ट्रिक डबल-डेकर बस वितरित केल्या जातील. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आणि त्यांची संख्याही वाढेल, अशी अपेक्षा आहे. मुंबईत गेल्या काही महिन्यांत किमान तीन बसना आग लागली. संबंधित ठेकेदार कंपनीवर ठोस कारवाई झाली नाही. त्याचाही परिणाम झाल्याची शक्यता काही वाहतूकतज्ज्ञ वर्तवत आहेत.

mumbai best bus
Sharad Pawar Resigns: '...अन्यथा खाली उतरणार नाही', चिंचेच्या झाडावर चढून वृद्धाचा पवारांसाठी सत्याग्रह

नवीन इलेक्ट्रिक बसच्या डिलिव्हरीला होणारा विलंब प्रवासीसंख्येत घट झाल्याचे कारण दिसते. करार झालेले कंत्राटदार तांत्रिक कारणे सांगून वेळेची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आम्ही त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत. त्यांपैकी कुणी कराराचा भंग किंवा विलंब केल्यास त्यांना दंड करू.

- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट

‘वेट लीज मॉडेल’व्यतिरिक्त पालिकेने बेस्टला स्वतःच्या बस खरेदी करण्यासाठी निधी द्यायला हवा. खासगी ऑपरेटरवर पूर्णपणे अवलंबून न राहता परवडणाऱ्या भाड्यात विश्वासार्ह आणि अखंड सेवा बेस्ट देऊ शकतात.

- आबासाहेब रणावरे, वाहतूकतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com