आता प्राण्यांनाही राखीव जागा ; पालिका महासभेत ठराव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - शहरातील वातावरणात पाळीव प्राण्यांना मोकळी हवा मिळावी यासाठी उद्यान व मैदानात राखीव जागा ठेवण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत मांडण्यात आला आहे. परदेशात पाळीव प्राण्यांसाठी मैदान, उद्यान जागा आरक्षित ठेवण्यात येते; मात्र मुंबईत अशी मोकळी जागा नाही. मुंबईतही पशुप्रेमी कुत्रे व मांजर पाळतात; पण त्यांना फिरवण्यासाठी, खेळण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही. त्यामुळे शहरातील सर्व मैदाने आणि उद्यानांत प्राण्यांसाठी जागा आरक्षित ठेवावी, अशी ठरावाची सूचना भाजपचे ऍड. मकरंद नार्वेकर यांनी महासभेत मांडली.

मुंबईत पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी उद्यान व मैदान नसल्याने अनेक पशुप्रेमींना आपल्या प्राण्यांना सायंकाळी किंवा रात्री रस्त्यांवर फिरायला आणावे लागते. पाळीव प्राण्यांना मोकळी हवा मिळावी यासाठी शहरात राखीव जागा ठेवण्याचा प्रस्ताव पालिकेत मांडण्यात आला आहे. सध्या मुंबईत तीन उद्यानांत पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी मोकळी जागा आहे. यात माटुंगा येथील फाइव्ह गार्डन, वांद्रे येथील कार्टर रोड आणि मलबार हिल येथील प्रियदर्शनी पार्कमध्ये जागा आरक्षित आहे; मात्र त्याचा वापर फक्त रविवारीच होतो. काही वर्षांपूर्वी प्राण्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात आली नाही.

माणसांनाच जागा अपुरी...
शहरी भागात प्रत्येक माणसी 10 चौरस मीटर जागा आवश्‍यक असल्याचे निकष केंद्र सरकारने 20 वर्षांपूर्वी मांडले होते. मुंबईत प्रत्येक माणसामागे 0.99 चौरस मीटर जागा उपलब्ध आहे, तर प्रस्तावित 2014-2034 या 20 वर्षांचा विकास आराखडा लागू झाल्यावर चार चौरस मीटर जागा उपलब्ध होईल, असा दावा प्रशासन करत आहे. लंडनमध्ये 4.84 चौरस मीटर, न्यूयॉर्क मध्ये 7.2 चौरस मीटर आणि शांघायमध्ये 9.16 चौरस मीटर जागा उपलब्ध आहे.

परदेशात पाळीव प्राण्यांसाठी मैदान, उद्यानात जागा आरक्षित ठेवण्यात येते; मात्र मुंबईत अशी मोकळी जागा नाही. मुंबईतही पशुप्रेमी श्‍वान, मांजर पाळतात; पण त्यांना फिरवण्यासाठी, खेळण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही. त्यामुळे शहरातील सर्व मैदाने आणि उद्यानांत प्राण्यांसाठी जागा आरक्षित ठेवावी, अशी ठरावाची सूचना भाजपचे ऍड. मकरंद नार्वेकर यांनी महासभेत मांडली.

Web Title: mumbai news reserve seat for animal