व्यवसायास दिलेले कर्ज माफ करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कल्याण - सरकारने सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी सरकारच्या विविध वित्तीय महामंडळातून दिलेले कर्ज माफ करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युवक आघाडीने मंगळवारी (ता. २५) कल्याण तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. 

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, या धर्तीवर सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या दूर करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन या वेळी शिष्टमंडळाने तहसीलदार अमित सानप यांना दिले. या मागण्या सरकारकडे पाठविल्या जातील, असे आश्‍वासन तहसीलदार सानप यांनी शिष्टमंडळाला दिले. मोर्चात अण्णा रोकडे, संग्राम मोरे, भीमराव डोळस, दासू ठोंबे, मानिक उघडे, संतोष जाधव, विकास खैरनार, सुमित माने, संजय जाधव, सुशील मनोहर आदींनी सहभाग घेतला.

Web Title: mumbai news rpi