

RTO employees on hunger strike
ESakal
मुंबई : आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून सुरू झालेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुमारे १०९ पदोन्नती आदेश काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतल्याची माहिती मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली.