
मुंबई : स्पुटनिक या रशियन लसीच्या चाचणीची ट्रायल राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात सुरु आहे. चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 144 जण निवडण्यात आले असून या चाचणीसाठी हे एकमेव रुग्णालय असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात 23 ठिकाणी हे ट्रायल सुरु झाले. राज्यातील औरंगाबाद येथील एमजीएम आणि मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात ट्रायल सुरू झाली.
21 जानेवारीपासून ही ट्रायल सुरू झाली असून 31 जानेवारीपर्यंत 144 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. आता 28 दिवसानंतर नंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. शिवाय, पुढचे 7 महिने ही ट्रायल सुरू राहणार आहे. कारण, लस दिलेल्या स्वयंसेवकांना काही महिने निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणते दुष्परिणाम जाणवतात का हे पाहिले जाणार असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.
दरम्यान 144 जणांना ट्रायल साठी घेण्यात आले असले तरीही यापैकी 108 जणांवर प्रयोग करण्यात येणार आहे. स्पुटनिक या लस ट्रायल साठी भारतभरातून 1500 जणांना निवडण्यात आले आहे. यात 18 ते 60 वयोगटातील व्यक्ती असून जोखमीच्या आजारातील रुग्णांचा अद्याप विचार केला नसल्याचेही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले. या लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी झालेल्या 18 व्यक्तींवर डिसेंबर अखेरपर्यंत ट्रायल करण्यात आली.
आता तिसऱ्या टप्प्यासाठी 144 जण 30 जानेवारी पर्यंत निवडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यातील 108 जणांना लसीकरण करण्यात आले तर 36 जणांवर प्लॅसिबो करण्यात आले. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड कडून या लसीचा परिणाम लॅन्सेट अहवालात प्रसिद्ध केला आहे. त्या नुसार ही लस 91.6 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर 2020 च्या सप्टेंबर महिन्यात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या सहभागाने लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी भारतात सुरुवात झाली.
mumbai news russian sputnik vaccine is being tested in mumbais saint george hospital
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.