सहार विमानतळावर 33 लाखांचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर केलेल्या कारवाईत 33 लाख 51 हजारांचे सोने जप्त केले. या प्रकरणी एका प्रवाशालाही अटक झाली. बॅंकॉकहून मुंबईपर्यंतच्या विमान प्रवासात एक प्रवासी सोने तस्करी करणार असल्याची माहिती "एआययू'च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. 14) रात्री सहार विमानतळावर सापळा रचला. सत्यनारायण रामचर्या छऱ्या हा बुधवारी रात्री बॅंकॉकहून सहार विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. "एआययू'च्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 33 लाख 51 हजार रुपयांचे सोने सापडले.
Web Title: mumbai news sahara airport gold seized