संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मादी बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मादी बिबट्याचा वृद्धापकाळाने गुरुवारी (ता. 8) मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नेत्रा या मादी बिबट्याचे निधन झाले. आता उद्यानात केवळ दहाच बिबटे लेपर्ड रेस्क्यू एन्ड रिहेबिलिटेशन सेंटरमध्ये उरले आहेत.

2007 साली अहमदनगरहून सहा वर्षांच्या नेत्राला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले गेले होते. गेल्या सहा महिन्यांपासून तिची तब्येत खालावत होती. तिच्या शरिराची हालचालही कमी झाली होती. नोव्हेंबर महिन्यातही नेत्राची तब्येत प्रचंड खालावली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरही नेत्राच्या हालचाली खूप कमी झाल्या. वृद्धापकाळात शरीर थकत गेल्याने तिचे अवयव निकामी होत गेले. अखेर गुरुवारी तिने अखेरचा श्वास घेतला. नेत्राच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या शरीराचे अवयव निकामी झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश पेठे यांनी सांगितले. तिच्या छातीत इन्फेक्शन झाले होते. शिवाय गर्भाशयालाही गाठी आल्या होत्या. साधारणतः बिबट्याचे वय सोळा ते सतरा वर्षे असते. नेत्रा शेवटच्या टप्प्यात खूपच आजारी होती. वृद्धापकाळातील आजारपणातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ पेठे यांनी दिली.

नेत्रावर टॅक्सीडर्मी होणार नाही. आता लेपर्ड रेस्क्यू केंद्रात आठ नर आणि दोन माद्या आहेत.

Web Title: mumbai news sanjay gandhi national park netra leopard