थेट सरपंच पदासाठी ग्रामपंचायतींत चुरस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

पहिल्या टप्प्यातील तीन हजार 884 गावांत मतदान
मुंबई - राज्यभरातील 16 जिल्ह्यांत उद्या (ता. 7) ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून, थेट सरपंच पदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने कमालीची चुरस आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार 884 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (ता. 9) होणार आहे.

मतदान शांततेत पार पडावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उद्या मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संस्था -
नाशिक 170, धुळे 108, जळगाव 138, नंदुरबार 51, औरंगाबाद 212, बीड 703, नांदेड 171, परभणी 126, जालना 240, लातूर 353, हिंगोली 49, अमरावती 262, अकोला 272, वाशीम 287, बुलडाणा 280.

Web Title: mumbai news sarpanch election