सायन-पनवेल मार्गावरील टोल वसुली थांबवणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई - सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (एसपीटीपीएल) सायन-पनवेल टोल प्लाझा रिकामा करण्याची तयारी सुरू केली आहे. "पीडब्ल्यूडी'ने वर्षभरापासून अनुदान दिले नसल्याने कंपनीने 29 डिसेंबरपासून सर्व टोल बॅरियर्स काढून टाकण्याचा आणि महामार्गाची देखभाल थांबवण्याचा इशारा दिला आहे.

एसपीटीपीएल कंपनीला पीडब्ल्यूडीकडून वर्षभरापासून प्रकल्पाच्या देखभालीसाठी कोणतेही अनुदान मिळालेले नाही. ते न मिळाल्यास या मार्गावरून जाणाऱ्या औद्योगिक वाहनांकडून टोल वसूल करण्याचे काम आणि महामार्गाच्या देखभालीचे कामही थांबवण्यात येईल, असा इशारा कंपनीने दिला आहे. यापूर्वी कंपनीने पीडब्ल्यूडीला 15 डिसेंबरची मुदत दिली होती. मात्र, ती न पाळल्याने कंपनीने 29 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता पीडब्ल्यूडीने कोणतीही कार्यवाही न केल्यास एसपीटीपीएल आपला डीम्ड हॅण्डओव्हर करेल, असा इशारा कंपनीने दिला आहे.

डीम्ड हॅण्डओव्हर करण्याच्या प्रक्रियेच्या प्रती विभागाचे सचिव आणि मुख्य सचिव यांना पाठवण्यात आल्या आहेत. या मार्गावरील लहान वाहनांचा टोल जानेवारी 2015 मध्येच बंद करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news sayan panvel toll recovery stop