शाळा अनुदानासाठीचा आत्मदहनाचा निर्णय मागे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठी शाळांना अनुदान मिळावे, यासाठी आझाद मैदानात तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ उपोषणाला बसलेल्या कैलास पाबळे पाटील यांनी आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

आझाद मैदानात स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू होते; परंतु तीन आठवडे उलटले तरीही शिक्षणमंत्र्यांनी दखल न घेतल्याने पाबळे पाटील यांनी अखेर आत्मदहनाचा निर्णय घेतला होता. याबाबतची माहिती तावडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलकांना सह्याद्री अतिथिगृहावर बैठकीसाठी निमंत्रित केले. अनुदान व इतर मागण्यांना येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची वेळ निघून गेल्याने पुढच्या पावसाळी अधिवेशनात तरतूद नक्कीच केली जाईल, असे आश्‍वासन तावडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

Web Title: mumbai news school subsidy Self combustion decission kailas patil vinod tawde