रिसॉर्टमध्ये शाळांच्या सहलींमागे आर्थिक हितसंबंध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

मुंबई - शाळांतील मुलांच्या सहली ऐतिहासिक ठिकाणी न्याव्यात, या सरकारच्या अध्यादेशाला फाटा देत बहुतांश गेल्या काही वर्षांपासून शाळा विविध रिसॉर्टमध्ये सहली नेत आहेत. यातून शाळा आणि संबंधित रिसॉर्टचे आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याबाबत टीचर्स डेमॉक्रॅटिक फ्रंट (टीडीएफ) या शिक्षक संघटनेने नाराजी दर्शवली आहे. डिसेंबर-जानेवारीत शाळांच्या सहली निघतात. मात्र आता या सहली केवळ रिसॉर्टमध्येच नेल्या जात आहेत. त्याच्या मोबदल्यात शिक्षकांना खास सवलतीही दिल्या जातात. या रिसॉर्टवर मुलांच्या संरक्षणाच्या उपाययोजना नसतात. तिथे प्रेमी युगुलांचे अश्‍लील वर्तनही सुरू असते. शाळांचे प्रशासन याबाबत फारसा विचार करत नाही. याला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी "टीडीएफ'चे राजेश पांड्या यांनी केली आहे.
Web Title: mumbai news school trip in resort