कधी टोपी न घालणारे इफ्तारची दावत देत आहेत - शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - जे लोक कधी टोपी घालत नव्हते, ते आज इफ्तारची दावत ठेवत आहेत. या लोकांचे मन साफ नाही म्हणून असे प्रयत्न केले जात असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दरवर्षी इफ्तार दावतचे आयोजन केले जाते. यावर्षीही सीएसएमटीच्या जवळ असलेल्या हज हाउस येथे इफ्तार दावतचे आज आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. मागील अनेक वर्षांपासून आम्ही ही दावत आयोजित करत आहोत. या दावतला हजर राहिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो, असेही पवार म्हणाले. 

आपल्या देशात विविध जाती-धर्मांचे लोक नांदत असून एकता दिसून येते; पण दुर्दैवाने आपल्या देशात काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत, जे आपल्या बंधुत्वामध्ये कटुता आणू पाहात आहेत, असा आरोपही पवार यांनी केला. मी वर्तमानपत्रात वाचले, की काही प्रतिगामी शक्ती आज इफ्तार दावतचे आयोजन करत आहेत. नागपुरात एक संस्था आहे, ज्यांनी या वर्षी रोजा इफ्तार दावतचे आयोजन केले होते. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचेही पवार म्हणाले. 

आज आपल्या देशात सर्वच गोष्टींवर बंधने घातली जात आहेत. कोण काय खाणार आणि काय घालणार हे ठरवले जात आहे, ही गोष्ट योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मांडले. शरद पवार हे या देशातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे नेतृत्व आहे. पवार यांनी नेहमी अल्पसंख्याक समाजाचा विचार केला. मात्र आज अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. या इफ्तार पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आदींनीही आपले विचार मांडले. 

Web Title: mumbai news Sharad Pawar criticized