शिवनेरी अपघातातील मृतांच्या वारसांना 10 लाख - रावते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई - पुण्यातील खडकी येथे सोमवारी एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसच्या डिकीचे झाकण अचानक उघडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला होता. या अपघातातील मृतांच्या वारसांना दहा लाखांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

जखमीला उपचारांचा खर्च एसटीमार्फत दिला जाणार आहे. याप्रकरणी एसटी महामंडळाने तातडीने कारवाई केली असून, चालकासह या बस दुरुस्तीचे काम करणारे दोन सहायकांना कामात हलगर्जी केल्याबाबत निलंबित केले आहे.

Web Title: mumbai news shivneri bus accident heir 10 lakh diwakar raote