ई-निविदेवरून पालिकेत शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई - ई-निविदा पद्धतीवरून आज पालिकेच्या सभागृहात शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी झाली. शिवसेनेने मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला भाजपने विरोध केला; मात्र तो डावलून हा प्रस्ताव महापौरांनी मंजूर केला. 

शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी जाचक असलेली ई-निविदा पद्धत रद्द करावी, अशी मागणी करणारा ठराव मांडला होता. भाजपने त्याला कडाडून विरोध केला होता. या पद्धतीने कंत्राटदारांना कामे दिल्यानंतर ती पूर्ण होण्यामध्ये अडचणी येतात आणि अनेक कामे नीट होत नाहीत. याबाबत अनेक तक्रारीही येतात. 

अलिबाबा व 40 चोर 
त्यामुळे ही पद्धत बंद करून यापूर्वीची सीडब्ल्यूसी कंत्राट पद्धत सोपी असल्याने ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सातमकर यांनी एका ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका सभागृहात केली होती. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी, ई-निविदा पद्धतीचे जोरदार समर्थन केले. तसेच पूर्वीची पद्धत ही अलिबाबा व 40 चोर असलेल्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी होती, अशी बोचरी टीका करून शिवसेनेला चांगलेच डिवचले. त्यावर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी, या पद्धतीमुळे नगरसेवकांची कामे रखडल्याचे सांगत पूर्वीची पद्धत चांगली होती, अशा शब्दांत सातमकर यांच्या ठरावाच्या सूचनेचे समर्थन केले. तसेच जर पूर्वीचे कंत्राटदार हे अलिबाबा आणि 40 चोर होते; तर आताचे कंत्राटदार काय "साव' आहेत का, असा प्रश्‍न केला. 

सपाचे गटनेते रईस शेख यांनी, या पद्धतीचे समर्थन केले; मात्र कामे रखडू नयेत, अशी मागणी केली. पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही ई-निविदा पद्धत असावी; मात्र नगरसेवकांची कामे होत नसल्याने त्यावर लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी शिवसेना-भाजप नगरसेवकांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. गदारोळात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी अखेर ठरावाची सूचना बहुमताने मंजूर करून घेतली. 

Web Title: mumbai news shivsena bjp municipal corporation