तुझ्या मेंदूत झोल, झोल!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

रेडिओ जॉकी मलिष्काला शिवसेनेचे प्रत्युत्तर
मुंबई - रेडिओ जॉकी मलिष्काचे मुंबई महापालिकेच्या कारभाराचे विडंबन करणारे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर शिवसेनेने त्याच चालीवर "तुझ्या मेंदूत झोल झोल' हे गाणे व्हायरल केले आहे.

रेडिओवर पैसे घेऊनच गाणी ऐकवली जातात, मलिष्काच्या या गाण्याचा प्रायोजक कोण, असा प्रश्‍नही शिवसेनेने उपस्थित केला आहे. पावसाळ्यात मुंबईत रस्त्यावरील खड्डे आणि त्यात तुंबलेले पाणी यातून मुंबईकर वाट काढतात. महापालिकेवर सर्व जण टीकेचा भडिमार करतात, परंतु मलिष्काने पहिल्यांदाच विडंबन गीतातून पालिकेला चिमटे काढले होते. तिचे हे गाणे शिवसेनेच्या जिव्हारी लागले. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी त्याच गाण्याच्या चालीवर गाणे लिहिले आणि ते व्हायरल केले.

विडंबनगीत चांगलेच असते. मात्र, त्यात वस्तुस्थितीचे वर्णन हवे. प्रत्येक गोष्टीत पालिकेला जोडणे अयोग्य आहे. मुंबई महापालिकेवर विश्‍वास असल्याने अनेक मलिष्का मुंबईत राहायला येतात. रेडिओवर पैसे घेऊनच गाणी ऐकवली जातात. मग या गाण्याचा प्रायोजक कोण, असा प्रश्‍न पेडणेकर यांनी उपस्थित केला. मुंबईत अनेक सरकारी संस्था काम करतात. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यांशी आणि रेल्वे सेवेशी पालिकेचा संबंध जोडणे अयोग्य असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

Web Title: mumbai news shivsena reply to redio jocky malishka