सायन-पनवेलवर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

तुर्भे - पावसाने उसंत घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे पेव्हर ब्लॉकने भरण्याचे काम हाती घेतले आहे; परंतु यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या कामामुळे वाशी टोल नाक्‍यापासून चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत. कळंबोली ते वाशी या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दोन ते तीन तास लागत आहेत. अगोदर पावसामुळे पडलेले खड्डे आणि आता दुरुस्ती यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत प्रवासी आणि वाहनचालकांचा मात्र कोंडमारा सुरूच आहे.

पावसामुळे सायन-पनवेल मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाशी टोल नाक्‍यापासून चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. कळंबोली ते वाशी हे अर्ध्या तासाचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहनांना बसत आहे. यामुळे तुर्भ्यापासून महापेपर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे चालक आणि प्रवासी मेटाकुटीला आले आहेत, तर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पोलिसांनाही खड्डे बुजवण्याचे काम करावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजविण्यास टाळाटाळ करत होता. हे काम सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे असल्याचे सांगून अधिकारी हात वर करत होते. महामार्गावरील खड्ड्यांमुळे येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. येथील खड्डे बुजविण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे या विभागाने खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे; परंतु यामुळे तुर्भे ते सानपाडा पोलिस ठाणे आणि सानपाडा ते जुईनगर रेल्वेस्थानक अशा वाहनांच्या रांगा लागत आहेत.

बाराशे कोटी गेले खड्ड्यांत
राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी १२०० कोटी खर्च करून कळंबोली ते वाशी टोल नाक्‍यापर्यंत सायन-पनवेल महामार्गाचे काम केले होते; परंतु २०१५ च्या पहिल्याच पावसात त्याची चाळण झाली होती. या वेळच्या तिसऱ्या पावसात तर महामार्गाचे खड्ड्यांमुळे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावर एक-एक फूट खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना ते दिसत नाहीत. त्यामुळे वाहने त्यात आदळतात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व प्रकारांमुळे सरकारचे बाराशे कोटी खड्ड्यांत गेले आहेत.

Web Title: mumbai news Sion-Panvel traffic