अवकाशात दिसला 'सुपर मून'चा अद्‌भुत नजारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मुंबई - खग्रास चंद्रग्रहणासह, ब्ल्यू मून व सुपर मूनला पाहण्याचा एकत्रित योग आल्याने खगोलप्रेमींनी अंधश्रद्धा बाजूला सारत निसर्गाच्या या किमयेचा आनंद घेतला. चंद्रग्रहण, ब्ल्यू मून व सुपर मून असा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी आल्याने हे ग्रहण सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरले होते.

पौर्णिमेदिवशी चंद्र पृथ्वीजवळ येतो, तेव्हा चंद्रबिंब 14 टक्के मोठे दिसते, याला सुपर मून म्हणतात. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्याने त्याला ब्ल्यू मून असे संबोधले जाते. बुधवारी हा तिहेरी योग आला होता. चंद्र दर्शानासाठी अनेकांनी सायंकाळपासून विविध उद्यानांपासून ते इमारतींच्या गच्चीपर्यंत ते नेहरू सायन्स सेंटरपर्यंत सगळीकडे हा अद्‌भुत नजारा पाहण्यासाठी गर्दी केली होती. शहरांमध्ये वाढलेल्या टोलेजंग इमारतींमुळे अनेकांना चंद्र पाहण्यासाठी काहीशी कसरतही करावी लागली. दुर्बिणीशिवाय केवळ डोळ्यांनीच यंदाचे ग्रहण दिसत असल्याने अनेकांनी मोकळ्या मैदानात येऊन या ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.

यानंतर सुपर मून, ब्ल्यू मून, चंद्रग्रहण
26 मे 2021 - सुपर मून, चंद्रग्रहण
31 डिसेंबर 2021 - ब्ल्यू मून व चंद्रग्रहण
31 जानेवारी 1937 - चंद्रग्रहण, ब्ल्यू मून व सुपर मून (माहिती स्रोत - पंचांगकर्ते दा. कृ. सोमण)

Web Title: mumbai news ssuper moon Lunar eclipse