विद्यार्थिनीची पवईत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - परीक्षेत कॉपी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 26) पवई परिसरात घडली. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली.

मुंबई - परीक्षेत कॉपी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 26) पवई परिसरात घडली. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली.

मृत विद्यार्थिनी पवईतील साकीविहार परिसरात राहत होती. ती कुर्ला येथील एका खासगी शाळेत आठवीत शिकत होती. सोमवारी एका विषयाचा पेपर लिहीत असताना तिला शिक्षिकेने कॉपी करताना पकडल्याचे सांगण्यात आले. शिक्षिकेने पेपर काढून घेत तिच्या पालकांना बोलावले होते. घरी पोचल्यानंतर विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: mumbai news student girl suicide