खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आयुक्तांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मुंबई - महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम रुजू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आतापर्यंत दोन हजार 700 कामगारांपैकी केवळ 290 सफाई कामगारांनाच सेवेत घेतले आहे; मात्र या कामगारांना तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. या कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. 

पालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. न्यायालयाने दोन हजार 700 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत केवळ 290 कंत्राटी कामगारांनाच सेवेत कायम करण्यात आले आहे. त्यांना तीन महिन्यांचे वेतनही मिळालेले नाही. शिवाय दिवाळीचे सानुग्रह अनुदानही मिळालेले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. काहींच्या भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा केलेले नाहीत. हे कामगारांचे प्रश्‍न त्यांनी आयुक्तांसमोर मांडले. यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी सुळे यांनी केली. महिनाअखेरपर्यंत हे प्रश्‍न सोडवण्याचे आश्वासन आयुक्त मेहता यांनी दिले. या वेळी कंत्राटी कामगारांचे नेते मिलिंद रानडे आणि सफाई कामगार उपस्थित होते.

Web Title: mumbai news supriya sule