शिक्षक परिषदेची उद्या 'शिक्षण वाचवा'ची हाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - शिक्षणाचे खासगीकरण, शाळांचे कंपनीकरण थांबावे यासाठी शिक्षक परिषदेकडून 27 मार्च रोजी "शिक्षण वाचवा' या जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेने दिली. शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठणकर, आमदार नागो गाणार, संजीवनी रायकर, अनिल बोरनारे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होतील. मोठ्या संख्येने बंद होणाऱ्या मराठी शाळा, अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्‍न, खासगी शाळांतील अवाजवी शुल्कवाढ आदी मागण्यांसाठी हे जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे.
Web Title: mumbai news teacher council education save