ठाकरे स्मारकाच्या जागेवर शिक्कामोर्तब

ठाकरे स्मारकाच्या जागेवर शिक्कामोर्तब

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासाची जागा देण्यात येणार असून, विकास आराखड्यातील "महापौर बंगला' यासाठी आरक्षित असलेल्या भूभागाच्या आरक्षणात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी सुधार समितीने मंजुरी दिली.

महापौर बंगल्याच्या जागेचे आरक्षण बदलून "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक' यासाठी आरक्षण करणे, तसेच हा भूखंड हरित क्षेत्रातून वगळून रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यास परवानगी देण्यात आली. हा भूखंड सीआरझेडमध्ये येत असल्याने केंद्राच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाची परवानगी घेण्यात येणार आहे. स्मारकाच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. स्थायी समिती, तसेच पालिकेच्या सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी माहिती सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com