

Bandra Terminus Expansion
ESakal
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसने त्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या देखभाल क्षमतेत वाढ केली आहे. तीन नवीन देखभाल मार्ग उघडल्यामुळे गाड्यांना अतिरिक्त पार्किंग जागा उपलब्ध झाली आहे. ज्यामुळे अधिक गाड्या चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹५३ कोटींपेक्षा जास्त आहे. रेल्वे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यासाठी, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे नवीन ट्रॅक बांधले जात आहेत.