Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Mumbai News:
Mumbai News:sakal

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२४ रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात एक नवीन सूचना जारी केली आहे. यामुळे दादरसह आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत.

मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, १ मे २०२४ रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त परेड आयोजित केली जात आहे. परेड सुरळीत पार पाडण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी ६.०० वाजल्यापासून ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. या अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले जात आहेत

Mumbai News:
Mumbai Local News: समर स्पेशलमुळे लोकल सेवा विलंबाने; मुंबईकर त्रस्त

अ) वाहतुकीस प्रवेश बंद व एक दिशा मार्ग -

एन. सी. केळकर मार्ग व एल. जे. रोड जंक्शन पासुन (गडकरी जंक्शनपासून) केळूस्कर मार्ग, दक्षिण व उत्तर जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

૨ केळूस्कर मार्ग दक्षिण, पूर्वेकडील वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील म्हणजेच या मार्गावर स्वातंत्रवीर सावरकर मार्गावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश मिळेल.

३ मीनाताई ठाकरे पुतळा येथून उजवे वळण घेवून केळूस्कर मार्ग उत्तर हा पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील.

४ एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहील,

५ स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन पर्चत वाहतूकीस बंद राहील.

६ सिध्दीविनायक जंक्शन येथून स्वातंत्रवीर सावकर मार्गे पश्चिम उपनगराकडे जावू इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी सिध्दीविनायक जंक्शन येथे उजवे वळण घेवून, एस. के. बोले रोडने पोर्तुगिज चर्च जंक्शन येथे डावे वळण घेवून गोखले रोड मार्गे गडकरी जंक्शन, एल. जे. रोड, राजा बडे चौक येथून पश्चिम उपनगराकडे प्रस्थान करतील.

७ येस बँक जंक्शन चेथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शन पर्यंत प्रवेश बंद केल्याने, दक्षिण मुंबईकडे जावू इच्छिणारे वाहन चालक हे त्यांची वाहने एस. व्ही. एस. रोडने येस बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क रोड नं. ५ म्हणजे पांडूरंग नाईक मार्गे राजा बडे चौक येथे आलेनंतर उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गडकरी जंक्शन मार्गे गोखले रोड मार्गाने दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करतील.

Mumbai News:
Mumbai Loksabha: बाळासाहेबांमुळे गंगुबाईचा कामाठीपुरा टिकला; त्यांचे आमच्यावर ऋुण

ब) वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले मार्ग (नो-पार्किंग)

१ केळूस्कर मार्ग दक्षिण व उत्तर.

२ कर्नल दिलीप गुप्ते मार्गावर केळूस्कर मार्ग उत्तर पासून पांडूरंग नाईक मार्गापर्यंत. १ पांडूरंग नाईक मार्ग, रोड नं. ५.

४ एन. सी. केळकर मार्ग, गडकरी जंक्शन पासून कोतवाल गार्डन पर्यंत. १ संत ज्ञानेश्वर मार्ग.

क) पोलीस, पी. डब्ल्यू. डी. आणि इतर शासकीय विभागाच्या वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था.

१ स्वातंत्रवीर सावरकर स्मारक. २ वनिता समाज सभागृह.

३ महात्मा गांधी जलतरण तलाव.

४ कोहिनुर सार्वजनिक वाहन तळ, एन. सी. केळकर रोड, दादर (प.), मुंबई.

Mumbai News:
Navi Mumbai Crime: बेकायदेशीर वास्तव्य; बांगलादेशी नागरिकांची धरपकड, कार्यवाही सुरू

ड) आमंत्रितांसाठी वाहतुक सूचना -

दक्षिण व मध्य मुंबईकडून टिळक उडड्राणपुला मार्गे शिवाजी पार्क येथे येणाऱ्या आमंत्रितांसाठी मार्ग :-

टिळक उड्डाणपूलमार्गे कोतवाल गार्डन सर्कल येथे उजवे वळण घेवून एन. सी. केळकर मार्गे गडकरी जंक्शन समोरुन मीनाताई ठाकरे पुतळा येथे उजवे वळण घेवून केळूस्कर मार्ग उत्तर मार्गाने शिवाजी पार्क गेट नं. ५ येथे डावे वळण घेवून सी. रामचंद्र चौक येथे डावे वळण घेवून स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनेने वसंत देसाई चौक (केळूस्कर दक्षिण जंक्शन) येथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क गेट नं. १ येथून प्रवेश करुन परेड मैदान असा मार्ग आहे.

दक्षिण मुंबईकडून डॉ. अॅनी बेझंट रोड मार्गे शिवाजी पार्क थेथे येणाऱ्या आमंत्रितांसाठी

मार्ग:- दक्षिण मुंबईकडून डॉ. अॅनी बेझंट मार्ग सेन्च्युरी जंक्शन येथून सरळ स्वांतत्रवीर सावरकर मार्ग श्री सिध्दीविनायक मंदिर जंक्शन ते वसंत देसाई चौक (केळूस्कर दक्षिण जंक्शन) येथे उजवे वळण घेवून शिवाजी पार्क गेट नं. ०१ येथून प्रवेश करुन परेड मैदान असा मार्ग आहे.

३ पश्चिम उपनगराकडून माहिम ओल्ड कॅडल रोडने शिवाजी पार्क येथे थेणाऱ्या आमंत्रितांसाठी पश्चिम उपनगराकडून येणाऱ्या आमंत्रितांनी माहिम जंक्शन ओल्ड कॅडल रोड हिंदुजा

मार्ग :- हॉस्पीटल समोरुन स्वातंत्रवीर सावरकर मार्गे दक्षिण वाहिनीने वसंत देसाई चौक (केळूस्कर

दक्षिण जंक्शन) थेथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क गेट नं. १ येथून प्रवेश करून परेड मैदान असा मार्ग आहे.

Mumbai News:
Mumbai Crime: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी कुटुंबाला पोलीसांनी केली अटक!

आमंत्रितांसाठी मार्ग :-

४ तसेच पश्चिम उपनगराकडून माहिम एल. जे. रोडने शिवाजी पार्क येथे येणाऱ्या पश्चिम उपनगराकडून माहिम चर्च समोरुन लेडी जमशेदजी मार्गे राजा बडे चौकातून पुढे - गडकरी चौक-उजवे वळण-एन. सी. केळकर मार्ग माँसाहेब मिनाताई ठाकरे पुतळा येथे उजवे वळण-केळूस्कर मार्ग उत्तर मार्गाने जावून शिवाजी पार्क गेट नं. ५ येथे डावे वळण- सी. रामचंद चौक (केळूस्कर मार्ग उत्तर जंक्शन) डावे वळण-स्वांतत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण

वाहिनीने वसंत देसाई चौक (केळूसकर गार्ग दक्षिण जंक्शन) थेथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क गेट नं. ०१ थेथून प्रवेश करून परेड मैदान असा असेल.

Mumbai News:
Mumbai News: मुंबईकरांनो लक्ष द्या, हे महत्वाचं रेल्वे फाटक आठवडाभर राहणार बंद

संचलन मार्ग-

संचलन, शिवाजी पार्क मैदानापासून सुरु होऊन गेट नं. ५ मधून बाहेर पडुन डावे वळण घेवून केळूस्कर मार्ग उत्तर ते सी. रामचंद्र चौक-डावे वळण-स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, दक्षिण वाहिनी ते संगितकार वसंत देसाई चौक (केळूस्कर रोड दक्षिण जंक्शन) ते उजवे वळण घेवून नारळी बाग येथे समाप्त होईल.

यामुळे सर्व वाहन चालकांनी सकाळी ०६:०० ते १२:०० वा. च्या दरम्यान वर नमुद रस्त्थाने प्रवास करणे टाळावे जेणेकरून प्रवासादरम्यान कभी गैरसोय होईल. तसेच था बाबत ठिकाणी बोर्ड/चिन्हाने वर्शविण्यात आले असून, प्रत्येक जंक्शन/सिग्नलवर वाहतुक पोलीसांचीही नेमणुक करण्यात आलेली आहे.

विना कारपास घेणाऱ्या स्थानिक व इतर नागरीकांकरीता सुचना १ मे रोजी परेड संचलनाचे वेळी विना कारपास येणाऱ्या स्थानिक व इतर नागरिकांनी आपली वाहने मुंबई महानगपालिका यांनी सुरु केलेल्या कोहिनुर सार्वजनिक वाहन तळ, जे. के. सावंत मार्ग, दादर (प.) येथे पार्क करण्याची विनंती करण्यात आली आहे

Mumbai News:
Mumbai Rode: ऐन पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल, अद्याप १२३ कामे सुरूच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com