ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या तपासणी वेळेत बदल

हर्षदा परब
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मुंबई  - ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये एचआयव्हीबाबत जागृती निर्माण व्हावी व त्यांच्यातील एचआयव्हीग्रस्तांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुंबई जिल्हा एड्‌स नियंत्रण सोसायटीने (एमडॅक) तपासणीच्या वेळेत बदल केला आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तींची राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे अडचणीचे होते. त्यामुळे जास्तीत जास्त ट्रान्सजेंडरपर्यंत पोहोचता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत सुमारे चार हजार ट्रान्सजेंडरची नोंदणी आहे. २०१६-१७ मध्ये यापैकी एक हजार ट्रान्सजेंडरपर्यंत एमडॅक पोहचू शकले नाही. ट्रान्सजेंडरपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या गुरूंची मदत घेतली जाते. पाचपैकी चार गुरूंच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रान्सजेंडरची तपासणी केली; मात्र त्यांच्या भेटण्याची, कामाची किंवा राहण्याची ठिकाणे बदलणे, काही जणांची दोन नावे असणे, सतत नाव बदलणे, तसेच काही जणांपर्यंत पोहोचता न येणे यामुळे काही जण या तपासणीतून सुटले आहेत, अशी माहिती एमडॅकच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली. जास्तीत जास्त ट्रान्सजेंडरपर्यंत पोहोचता यावे यासाठी सायंकाळी उशिरा त्यांच्या तपासणीचा निर्णय घेतल्याचे डॉ. आचार्य यांनी सांगितले. यासाठी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत कॅम्प घेण्याचा निर्णय एमडॅकने घेतला आहे. त्यांच्या कामाच्या वेळेपूर्वी त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काही वर्षांतील सततच्या तपासण्या आणि समुपदेशनामुळे ट्रान्सजेंडरमधील एचआयव्हीबाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. अतिधोका असलेल्या इतर गटातील व्यक्तींमध्येही एचआयव्हीचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. जास्तीत जास्त व्यक्तींची तपासणी झाल्याने हा आकडा वाढल्याचे डॉ. आचार्य यांनी सांगितले.

येथे तपासणी सुरू
कामाठीपुरा, अंधेरी, मालवणी, घाटकोपर, दहिसर, भांडुप, शिवाजीनगर (गोवंडी) या भागांमधील ट्रान्सजेंडरच्या तपासण्या सुरू केल्याचे डॉ. आचार्य यांनी सांगितले.

 लक्ष्य संख्या-     ११,००० 
 प्रत्यक्ष तपासणी-     १२,००० 
 एचआयव्हीबाधित-     ७३ 

वर्ष                   एचआयव्हीबाधित रुग्ण 
 २०१४-२०१५              ४४ 
 २०१५-२०१६              ४६ 
 २०१६-२०१७              ७३

Web Title: mumbai news transgender person cheaking time change