शिधावाटप दुकानात  रास्त दराने तूरडाळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नवी मुंबई - राज्यातील शिधावाटप दुकानांतून स्वस्त दरात तूरडाळ विक्रीचा शुभारंभ सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सानपाडा येथे झाला. ही तूरडाळ 55 रुपये किलोने शिधापत्रिकाधारकांना मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. 

तुर्भे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील श्री सप्तशृंगी कंपनीत तूरडाळ पुरवठा करणाऱ्या वाहनाला हिरवा बावटा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी सप्तशृंगीचे लामक द्वारकानाथ राठी, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक नीलिमा केरकट्टा, गजानन देसाई, शिधावाटप अधिकारी आदी उपस्थित होते. 

मधल्या काळात नागरिकांना 200 रुपये इतक्‍या चढ्या दराने तूरडाळ खरेदी करावी लागत होती. नाफेड आणि राज्य सरकारने 75 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली असून तिचे मिलिंग करून एक किलोच्या पिशव्या तयार केल्या आहेत. नागरिकांना त्या 55 रुपयेप्रमाणे मिळतील. यामुळे एकीकडे ग्राहकांना स्वस्त दराने डाळ मिळत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनाही हमी भाव मिळत आहे, असे देशमुख यांनी सांगितले. 

Web Title: mumbai news turdal ration card