दोन चिनी नागरिकांना हिरा चोरल्याने अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - प्रदर्शनात हातचलाखी करून 34 लाखांचा हिरा चोरणाऱ्या दोघांना वनराई पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले. चियांग चांग क्विंग आणि डेंग झियाब्रो अशी त्यांची नावे असून, ते चीनचे नागरिक आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोरेगाव पूर्वमधील "नेस्को' येथे 27 ते 31 जुलैदरम्यान आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनात एका परदेशातील उद्योजकाने सोन्याच्या दागिन्यांचे स्टॉल लावले होते. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असल्याने तेथे चोख सुरक्षा व्यवस्था होती. रविवारी (ता. 30) चियांग आणि डेंग हे मुंबईत आले होते. काल सकाळी ते प्रदर्शनाच्या ठिकाणी आले. एका स्टॉलवरील खरा हिरा चोरून त्यांनी तिथे खोटा हिरा ठेवला. नंतर ते टॅक्‍सीने सहार विमानतळाकडे गेले. 34 लाखांचा हा हिरा चोरीला गेल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तेथील कामगारांची चौकशी केली. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहताना पोलिसांना या दोन चिनी नागरिकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सहार विमानतळावर विमान उड्डाण करण्याच्या 15 मिनिटे आधी "सीआयएसएफ'ने या दोघांना पकडून वनराई पोलिसांच्या ताब्यात दिले.

शाम्पूच्या बाटलीत हिरा
या चोरट्यांनी प्रदर्शनातून बटणाएवढा हिरा चोरला होता. त्यांनी तो शाम्पूच्या बाटलीत लपवला होता. सामानाची झडती घेताना ही बाटली सापडली.

Web Title: mumbai news two chin people arrested in diamond theft