दोन रुमानियन नागरिकांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

मुंबई - मुलुंडमधील खासगी बॅंकेच्या एटीएममधून बनावट डेबिट कार्डद्वारे लाखो रुपये काढणाऱ्या रुमानियाच्या दोन नागरिकांना नवघर पोलिसांनी अटक केली.

मुंबई - मुलुंडमधील खासगी बॅंकेच्या एटीएममधून बनावट डेबिट कार्डद्वारे लाखो रुपये काढणाऱ्या रुमानियाच्या दोन नागरिकांना नवघर पोलिसांनी अटक केली.

नवघर परिसरातील कोटक महिंद्रा बॅंकेच्या एटीएममधून 58 जणांचे पैसे काढण्यात आले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. दोन्ही आरोपी दिल्लीत लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झाले. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी दोन्ही ठकसेनांना बेड्या ठोकल्या. मरिन दुमित्रू ग्रामा आणि लोलेन लुसियन मिलू अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी 17 आणि 18 डिसेंबरला स्कॅनर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने बनावट कार्डचे क्‍लोनिंग करून अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये काढले होते.

या दोन्ही आरोपींना व्ही. बी. नगर पोलिसांनी एटीएम स्किमिंगच्या गुन्ह्यांत 2015 मध्ये अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडून 28 लाख रुपये आणि 497 बनावट एटीएम कार्ड जप्त केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच गुन्हा केला.

Web Title: mumbai news two rumania people arrested