उबरचालकांचा संपही मागे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - उबरच्या व्यवस्थापनाने चालक व भागीदारांच्या मागण्या गुरुवारी मान्य केल्या. त्यामुळे या चालक-मालकांनी चौथ्या दिवशी संप मागे घेतला. पारदर्शक व्यवहार करण्याचे, तसेच कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याचे आश्‍वासन उबेर व्यवस्थापनाने दिले आहे. ओला, उबरच्या व्यवस्थापनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करीत या कंपन्यांच्या चालक-मालकांनी सोमवारपासून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारला होता. व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर ओलाच्या चालक-मालकांनी बुधवारी संप मागे घेतला होता. गुरुवारी घाटकोपर येथील चिरागनगर पोलिस ठाण्यात उबरचे अधिकारी आणि संपकऱ्यांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. या वेळी उबर व्यवस्थापनाने काही मागण्या मान्य केल्या.
Web Title: mumbai news uber driver strike stop