उद्धव ठाकरेंच्या तंबीनंतर मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्याची तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देताच मंगळवारी (ता. 20) सभागृहनेते यशवंत जाधव यांनी मालमत्ता करमाफीच्या ठरावाची सूचना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना सादर केली. या महिन्यांच्या महासभेत ही ठरावची सूचना मंजुरीसाठी येऊ शकते. 

महापालिका निवडणुकीत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार आणि 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले होते. त्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नव्हती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरसेवकांना दिले. त्यानंतर 500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, तसेच 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 60 टक्के सवलत द्यावी, अशी ठरावाची सूचना जाधव यांनी महापौरांना सादर केली. ही ठरावाची सूचना याच महिन्यात मंजूर होण्याची शक्‍यता आहे. महासभेच्या मुंजरीनंतर हा ठराव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रशासनाने मालमत्ता कर माफ करण्याची तयारी दाखवल्यास तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल. राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर मालमत्ता कर माफ होईल. 

500 कोटीहून अधिक तोटा 
मालमत्ता कर माफ झाल्यास पालिकेला 500 कोटी रुपयांपर्यंतचा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. वस्तू व सेवा करातून नक्की किती उत्पन्न मिळेल, याची माहिती नसल्याने 500 कोटी रुपयांचा तोटा पालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: mumbai news uddhav thackeray tax