उल्हासनगर पालिकेचा अर्थसंकल्प ५८६.४५ कोटींचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेचा एकूण ३.७३ कोटी रुपये शिलकीचा ५८६.४५ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी (ता.२८) सायंकाळी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्थायी समिती सभापती कांचन लुंड यांना सादर केला. उत्पन्न ५८६.४५ कोटी आणि खर्च ५८२.७२ कोटी असा हा ३.७३ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प असून त्यात कोणत्याही करात वाढ करण्यात आलेली नाही. मुख्य लेखाधिकारी दादा पाटील, हरेश ईदनानी, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे आदी या वेळी उपस्थित होते.

अर्थसंकल्पात उत्पन्नात स्थानिक संस्था कर १८ कोटी, मालमत्ता कर १८५.२५ कोटी, पाणी पट्टी ४१ कोटी, इमारटीपी अंतर्गत वसुली ६५.१५ कोटी, परवाने शुल्क २.३ कोटी, अनुदाने २२८.१५ कोटी, अमृत योजना ३५.०२ कोटी, इतर ११.८५ कोटी दाखवण्यात आले आहे, तर खर्चात पगार भत्ते व इतर प्रशासकीय खर्च ११२.२१ कोटी, एमआयडीसी ३०.५० कोटी, कर्ज परतफेड ४०.८५ कोटी, शहर रोषणाई ११.०८ कोटी, कचरा वाहतूक व जंतूनाशक आदी ३२.३१ कोटी, उद्याने ८.३५ कोटी, अग्निशमन व आणीबाणी २.४१ कोटी, दवाखाना व आरोग्य ४.९१ कोटी, रस्ते व पायाभूत सुविधा ८९.६० कोटी, प्रभाग समित्या ३.१२ कोटी, पाणी पुरवठा २३ कोटी, मलः निस्सारण ३४.२५ कोटी, भुयारी गटार २.६७ कोटी, प्राथमिक शिक्षण २.१५ कोटी, परिवहन सेवा २.१५ कोटी, असाधारण लेखे २६.४१, अमृत योजना ९१ कोटी, इतर १४.०९ कोटी नमूद करण्यात आले आहे.

ट्रेड लायसनद्वारे वसुली
व्यापाऱ्यांकडून केवळ टॅक्‍स वसूल केला जातो. उत्पन्नात भर पडावी म्हणून ट्रेड लायसनद्वारे वसुली होणार असून त्याद्वारे किमान ५० कोटी रुपये अधिक मिळेल असा विश्‍वास आहे. यापुढे ठराविक रस्ते काँक्रीटचे केले, तर त्याखाली असलेल्या पाण्याच्या वाहिन्यांमुळे रस्ता खोदावा लागल्यास खर्च वाया जाणार असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे, असे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. अर्थसंकल्पात कोणतीही वाढ करू नये, असे सभापती कांचन लुंड यांना सुचवले आहे, अशी माहितीही निंबाळकर यांनी दिली.

Web Title: mumbai news ulhasnagar municipal corporation