अर्थसंकल्पापूर्वी समोर आलेल्यता 'त्या' निनावी पत्रामुळे मुंबई महापालिकेत खळबळ

सुमित सावंत
Wednesday, 3 February 2021

या पत्रात तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदा पद्धतीबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.   

मुंबई : देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. मागील वर्षाचा अर्थसंकल्प हा तब्बल ३३ हजार कोटींपेक्षा अधिकच होता. यंदाच्या बजेटमधून मुंबईकरांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र अर्थसंकल्पापूर्वी समोर आलेल्या 'त्या' निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. 

मुंबई महापालिकेला घोटाळ्यासंदर्भात एक निनावी पत्र मिळाल्याचा दावा भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांनी केलेला आहे. SAP प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत मुंबई महानगर पालिकेतील काही निवडक कर्मचारी कंत्राटदारांना मदत करत असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. आज बजेट सादर होणार आहे. त्याआधी भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांना आलेल्या या निनावी पत्राची चांगलीच चर्चा आहे. 

महत्त्वाची बातमी :: हापूस आंब्यासाठी थेट निर्णयात बदल, APMC मधील बदललेल्या महत्त्वाच्या निर्णयाची रविवारपासून अंमलबजावणी

काय आहे निनावी पत्रात ? 

  • सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महापालिकेला २८ जानेवारी रोजी एक निनावी पत्र आलं
  • या पत्रात काही कंत्राटदार आयटी विभागतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कंत्राट कामातील अन्य कंत्राटदारांनी भरलेल्या निविदेतील रकमेची बोली जाणून घेऊन स्वतः कामाची कमी बोलीची निविदा भरत कामं मिळवता अशी माहिती 
  • या पत्राची प्रत महापालिका आयुक्त, आयटी विभाग प्रमुख, सर्व विभागाचे प्रमुख अभियंता, पालिकेतील राजकीय पक्षांचे गटनेता आणि मुंबई पोलिसांना पोहचली असल्याची माहिती
  • निनावी तक्रारदाराने आयटी विभागाचे कर्मचारी आणि सॅप कंपनीचे कर्मचारी यांच्याबाबत शंका उपस्थित केली आहे 
  • सॅप प्रणालीत हस्तक्षेप करून कंपनीचे कर्मचारी काही निवडक कंत्राटदारांना मदत करत असल्याचा आरोप

महत्त्वाची बातमी :: ड्रग्ज तस्करीचे पाकिस्तान कनेक्‍शन! तस्कर आरिफ भुजावालाच्या पत्नीची पाकिस्तानवारी 

त्याचबरोबर या पत्रात तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदा पद्धतीबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ठराविक कंपन्यांना कशा पद्धतीने कामं मिळतात याची सविस्तर माहितीच दिली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय .

दरम्यान,  मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मात्र असं कोणतंही पत्र आलेलं नसल्याचं माध्यमांना सांगितलं आहे. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

mumbai news unknown letter to bmc stating corruption via sap system for getting contracts

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news unknown letter to bmc stating corruption via sap system for getting contracts