शिवसेना-भाजपच्या राजकारणात शेकडो रोपांचा गेला बळी

अक्षय गायकवाड
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

विक्रोळी (मुंबई) : शिवसेना-भाजप या पक्षांनी आता पर्यावरणातही राजकारण करण्याचे ठरविले आहे. पवईत दुर्गादेवी शर्मा उद्यानात लावलेली शेकडो रोपे उपटून टाकल्यावरून दोन्ही पक्षांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत.

विक्रोळी (मुंबई) : शिवसेना-भाजप या पक्षांनी आता पर्यावरणातही राजकारण करण्याचे ठरविले आहे. पवईत दुर्गादेवी शर्मा उद्यानात लावलेली शेकडो रोपे उपटून टाकल्यावरून दोन्ही पक्षांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत.

भाजपच्या स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्या दबावाखाली ही रोपे उपटून टाकल्याचा आरोप शिवसेनेचे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी केला आहे. त्यासाठी मृत झालेल्या झाडांना श्रद्धांजली वाहून शिवसेनेने गुरुवार ता. ८ रोजी निषेध केला. पवई येथील चैतन्य नगर येथे असलेल्या दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेतर्फे आमदार सुनील राऊत याच्या प्रयत्नाने एक हजार पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली होती. म्हाडाचा चाळीस लाखाचा निधी देखील याच्या सुशोभीकरणासाठी प्रस्तावित केला होता.

शिवसेनेतर्फे या विरोधात मृत झालेल्या रोपट्याची अंत्य यात्रा करण्यात येणार होती. परंतु, त्या आधीच सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या आधी  या सर्व झाडांना शिवससैनिकांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. रोपे उपटणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी या वेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली. तर म्हाडा ने पालिकेची परवानगी न घेता इथे काम सुरु केले होते. सदर झाडे आधीच मृत झालेली म्हणून काढली गेली आणि आम्ही कोणावरही दबाव आणला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी दिली आहे.

शिवसेना आणि भाजपच्या श्रेयवादात मात्र शेकडो रोपांचा बळी गेला आणि निधीची उधळपट्टी झाली आहे.

Web Title: mumbai news vikhroli shivsena bjp politics and tree plant